Pune Crime News | अस्तित्वात नसलेल्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करुन फसवणूक; बनावट कुलमुखत्यार पत्र बनवून फसवणुक करणार्‍या मानस कन्स्ट्रक्शनचे भागीदार मधु मेहता, सुरज मेहतासह 6 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  वेळेत बांधकाम पूर्ण करुन ताबा न दिल्याने न्यायालयाने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द केली. असे असताना बनावट पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी (कुलमुखत्यार पत्र) तयार करुन त्याद्वारे ३ मजल्याची इमारत असताना अस्तित्वात नसलेल्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करुन मुळ जमीन मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

याबाबत अविनाश अनंत गलांडे (वय ६७, रा. प्रभु प्रसाद, शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मानस कन्स्ट्रक्शनचे (Manas Construction) भागीदार मधु मेहता (Madhu Mehta Partner of Manas Construction), सुरज मेहता, नितीन काकडे, मेघा काकडे, सुरेश ऊर्फ विठ्ठल आसलेकर (Suresh alias Vitthal Aslekar) आणि अ‍ॅड. दौलत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००३ पासून २०२४ पर्यंत सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आजी ताराबाई शंकर पराडकर यांच्या नावे असलेली शुक्रवार पेठेतील सुभाष नगर येथील मिळकत विकसन करण्यासाठी त्यांनी मानस कन्स्ट्रक्शन व त्याचे भागीदार राजीव गांधी, लक्ष्मीदेवी विमलचंद मेहता, मणिबेन मेहता यांना रजिस्टर विकसन करारनाम्याने दिली होती. या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी डेव्हलपमेंट अ‍ॅग्रिमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे फिर्यादी व त्यांचा भाऊ अनिकेत गलांडे यांना प्रत्येकी एक फ्लॅट देण्याचे ठरले होते. तिसऱ्या   मजल्यावरील दोन फ्लॅट मानस बिल्डर्सला देण्याचे ठरले होते. बिल्डरने मुदतीत फ्लॅटचा ताबा न दिल्याने त्यांनी २००९ मध्ये दिवाणी दावा दाखल केला. त्याचा निकाल २०१३ मध्ये लागून न्यायालयाने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द केली होती . त्यानंतर बिल्डर मधु श्रीपाल मेहता यांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा फर्निचर करण्यासाठी २०१९ मध्ये दिला होता.

बिल्डिंगचा मुख्य आराखडा हा तीन मजली असताना  बांधकाम व्यावसायिकाने चौथा मजला बांधला. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता फिर्यादी यांच्या हिस्साला येणार्‍या टेरेसवर अस्तित्वात नसलेला १ बीएचके फ्लॅट नितीन काकडे व त्यांची पत्नी मेघा काकडे यांना फिर्यादी यांच्या आजीचे बनावट पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा वापर करुन २०२४ मध्ये विक्री केला आहे. तसेच फ्लॅटची कागदपत्रे सादर करता मधु मेहता यांनी चुकीचे घोषणापत्र सादर केले आहे. या मिळकतीबाबत मानस बिल्डर्स यांनी फिर्यादी यांच्या आजीसोबत पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी केलेली असताना त्याच प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सुरेश ऊर्फ विठ्ठल आसलेकर यांनी मधु मेहता यांना अ‍ॅड. दौलत बी राऊत यांच्यासोबत संगनमत करुन फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट बनवली. या मिळकतीमधील फिर्यादी यांच्या हिस्स्याला   येणार्‍या टेरेसवर अस्तित्वात नसलेला १ बीएचके फ्लॅट नितीन काकडे व त्यांची पत्नी मेघा नितीन काकडे यांना विक्री केला आहे़.सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.

You may have missed