Ganesh Shahaji Kaspate Arrested | बेड्या घेऊन अटक वॉरंट बजावण्यासाठी गेला होता गणेश कस्पटे; अर्ध्या वाटेत 5 लाख घेऊन दिले होते सोडून, गणेश कस्पटेचा काळा कारनामा आला समोर

Ganesh Shahaji Kaspate Arrested | Ganesh Kaspate went to execute the arrest warrant with handcuffs; Halfway there, he took 5 lakhs and left, Ganesh Kaspate's black deed came to light

पुणे : Ganesh Shahaji Kaspate Arrested |  अटक वॉरंट बजावण्यासाठी जाताना गणेश कस्पटे हा बेड्या घेऊन खासगी कारमधून कंपनीच्या मालकाच्या घरी गेला होता. घरातील लोकांसमोर बेड्या दाखवुन तुम्हाला अटक करायला आलो आहे, अशी भिती दाखवून त्याने ५ लाख रुपये उकळले असल्याचा गणेश कस्पटे याचा कारनामा समोर आला आहे.

गणेश शहाजी कस्पटे Ganesh Shahaji Kaspate (वय ४०, रा. शंकर सुमन हाईटस, भेकराईनगर, फुरसुंगी) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणेश कस्पटे याला अटक केल्यानंतर आता त्याचे कारनामे पुढे येत आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याकडे वॉरंट बजावण्याचे काम देण्यात आले होते. त्यामुळे त्याने अशाच प्रकारे यापूर्वी वॉरंट बजावण्यासाठी त्याच्याकडे दिलेल्या लोकांकडून खंडणी उकळली असावी, असे सांगितले जाते.

तक्रारदार यांच्या कंपनीच्या मालकावर हैदराबाद कोर्टामध्ये चेक बाऊन्सची केस चालू होती. त्या केसमध्ये तक्रारदार यांच्या मालकास नॉन बेलेबल वॉरंट निघाले होते. ते वॉरंट बजावण्याचे काम यापूर्वीही गणेश कस्पटे याच्याकडे दिले होते. ३ मार्च २०२६ रोजी हे वॉरंट बजावण्यासाठी तो तक्रारदार मालकाच्या घरी बेड्या घेऊनच गेला होता. घरातील लोकांसमोर त्याने या बेड्या दाखवुन या बेड्या घालून तुम्हाला येऊन घेऊन जाण्याचा आदेश आहे, असे सांगून घरातील सर्वाना भिती दाखविली होती. त्यांना आपल्या खासगी गाडीत घालून काही अंतर तो घेऊनही गेला होता. त्यानंतर त्याने अटक टाळण्यासाठी व वॉरंट परत पाठविण्यासाठी त्यांच्याकडून ५ लाख रुपये उकळले होते.

त्यानंतर आता परत आलेले वॉरंट न बजावण्यासाठी त्याने अडीच लाखांची मागणी केली होती. यावेळी तक्रारदार यांचे मालक आजारी असल्याने त्यांनी तक्रारदारांना पाठविले होते. चांगला बकरा सापडला, आताही चांगला माल मिळेल, असे वाटून त्यांनी पुन्हा मागणी केली. त्याला ती गोत्यात आणायला कारणीभूत ठरली.

You may have missed