Pune Crime News | व्यावसायिकाचे अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासह 5 जणांवर आणखी एक गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन भावाचे अपहरण करुन मारहाण करुन सव्वा सात लाख रुपये जबरदस्तीने खंडणी उकळून जमीन साथीदाराच्या नावावर करण्यास सांगणार्या गँगस्टर टिपू पठाण याच्यासह ५ जणांवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टिपू पठाण याने सय्यदनगर, हडपसर परिसरात अनेकांना धमकावुन त्यांच्या जागा ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी त्याच्या टोळीवर २ मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. महापालिकेच्या मदतीने पोलिसांनी त्याचे बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकले. न्यायालयाने वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने टिपू पठाण याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आणखी एक खंडणीचा गुन्हा टिपू पठाणवर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत हडपसर येथील एका ३४ वर्षाच्या व्यावसायिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी टिपू ऊर्फ रिजवान सत्तार पठाण (Tipu alias Rizwan Sattar Pathan), समीर छोटू शेख Sameer Chotu Shaikh (रा. सय्यदनगर, हडपसर), राहुल गव्हाणे, सुरज हंगारगे, इरफान नासीर शेख Irfan Naseer Shaikh (रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसरमधील सय्यदनगर व डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवर २०१६ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान घडली आहे. यातील टिपू पठाण हा कारागृहात असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर येथील राहणारे असून त्यांच्या रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांना समीर शेख याने वेळोवेळी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या साथीदारांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जबरदस्तीने गाडीमध्ये बसवुन पैशांची मागणी केली. १० मे २०२४ रोजी फिर्यादी व त्यांच्या भाऊ यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवुन रामटेकडी येथील वैदुवाडी येथे घेऊन गेले. तेथे लोखंडी रॉडने मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गाडीमधील रोख ६ लाख रुपये व १ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. ६ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी व त्यांच्या मित्राला टिपू पठाण याने फोन लावून जबरदस्तीने २० लाख रुपयांचे सही असलेले चेकबुक व १ लाख २० हजार रुपये राहुल गव्हाणे याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर टिपू पठाण याने फिर्यादी व त्यांच्या मित्राला वारंवार फोनद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सासवडजवळील भिवरी येथील जमीन राहुल गव्हाणे याच्या नावे करण्यास सांगितली. पोलीस हवालदार अमोल शिंदे अधिक तपास करीत आहेत.
