PMC Issue Notice To Dinanath Hospital | दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेची नोटीस; चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश

PMC Issue Notice To Dinanath Hospital | Municipal Corporation's notice to Dinanath Hospital; Order to submit report within 24 hours in case of death of child

पुणे : PMC Issue Notice To Dinanath Hospital |  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रियांशा बागडे या सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावत २४ तासांच्या आत संपूर्ण वैद्यकीय माहिती, केसपेपर आणि उपचार नोंदी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी बुधवारी रुग्णालय प्रशासनाला नोटीस पाठवली. मृत मुलगी प्रियांशी बगाडे (वय ६) हिला डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली.

या घटनेप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्याकडूनही तपास सुरू असून शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळणार असल्याची माहिती आहे. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शस्त्रक्रियेदरम्यान काही वैद्यकीय त्रुटी झाल्या होत्या का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून महापालिकेकडून सखोल चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे.

नेत्रतज्ज्ञांच्या मते, लहान मुलांच्या शस्त्रक्रियेदरम्यान विशेष काळजी आवश्यक असते. भूल देण्याच्या आणि श्वसन नळीच्या प्रक्रियेत अगदी छोट्या त्रुटीमुळेही गंभीर गुंतागुंत किंवा रक्तस्राव होण्याची शक्यता असते.

You may have missed