Hinjewadi Pune Crime News | पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंची फसवणूक; हिंजवडीतील थिनटेक टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीतील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे / पिंपरी : Hinjewadi Pune Crime News |  नोकरीचे आमिष दाखवून ट्रेनिंग दिल्यानंतर आणि काम करून घेतल्यानंतर तरुणांना वेगवेगळ्या कारणांनी कामावरून काढून टाकत त्यांच्याकडून घेतलेले पैसे व पगार न देत लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२५ ते १ जून २०२६ या कालावधीत हिंजवडी फेज-२ येथील गेरा इंपेरिअम राईज परिसरात घडली.

याप्रकरणी सौरव राजन नायर (वय २५, रा. देहूरोड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हर्षल भानुदास ठाकरे (Harshal Bhanudas Thackeray), ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रमुख ध्रुविल पारेख, एचआर अधिकारी सौम्या सिंग तसेच थिनटेक टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीतील (Thintech Technology Pvt. Ltd. Company) इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि इतर साक्षीदारांना ट्रेनी म्हणून नियुक्त केले. त्यांच्याकडून काम करून घेतल्यानंतर प्रत्येकी १५ हजार रुपये आणि दोन महिन्यांचा पगार देण्याचे आश्वासन पाळले नाही. एकूण ११ लाख २५ हजार रुपयांची रक्कम न देता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरत संबंधितांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

You may have missed