Pune Crime News | तुळापूर पार्टीत 23 तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय; फार्म हाऊस मालकासह 78 जणांवर गुन्हा दाखल, बंगला लग्न, साखरपुड्यासाठीही दिला जात होता भाड्याने

Pune Crime News | 23 youths suspected of consuming drugs at Tulapur party; Case registered against 78 people including farm house owner, bungalow was also rented out for weddings, engagement parties

पुणे : Pune Crime News |  तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये अनेकांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रोजेक्ट एक्स नावाने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये ४९ तरुणीही सहभागी झाल्या होत्या. त्यांची तपासणी करुन पोलिसांनी त्यांना चौकशीला उपस्थित राहण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. ज्या तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केले आहे, असा संशय आहे, अशा किमान २३ तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा संशय आहे, त्यांना ससून रुग्णालयात पाठवून त्यांच्या रक्ताचे सॅम्पल घेण्यात आले आहे.

या प्रकरणी डि मोरो कंपनीच्या (DI Mora) मालकांसह ७८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिक सुरवसे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आळंदी -मरकळ रोडवरील हा खासगी बंगला पिंपरीतील नरेंद्र सुंदरलाल चुघ कुटुंबियांचा असल्याची माहिती समोर आली आहे. हा बंगला लग्न समारंभ, छोट्या मोठ्या पार्टींसाठी भाड्याने दिला जातो. येथे नेहमीच कार्यक्रम होत असतात. त्यामुळे सुरुवातीला लोकांना वाटले की ही नेहमीप्रमाणे कोणत्या तरी कंपनीची पार्टी आहे. परंतु, पोलिसांनी पहाटे अडीच वाजता छापा टाकला तेव्हा ही रेव्ह पार्टी असल्याचे समोर आले.

गुन्हे शाखेचे १५ पोलीस अधिकारी आणि ६५ पोलीस अंमलदार यांनी हा छापा टाकून रेव्ह पार्टी उघडकीस आणली. या ठिकाणाहून गांजा, हुक्का पॉट तसेच ९ लाख २२ हजार रुपयांच्या दारुच्या बाटल्या, साऊंड सिस्टिम असा तब्बल ८५ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

इव्हेंट मॅनेजमेंटचा यश राज चौधरी (Yash Raj Choudhary), ऐमन सैफ शेख (Aiman ​​Saif Shaikh), सैफ आसिफ सय्यद (Saif Asif Syed), सिद्धांत संतोष धुवाडी (Siddhant Santosh Dhuwadi), दिशांत संतोष धुवाडी (Dishank Santosh Dhuwadi), अली रौफ पानसरे (Ali Rauf Pansare), आवेश समशुलहक अन्सारी (Awesh Samsulahaq Ansari) या प्रमुख आयोजकांसह ७८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात १५ बाऊंसर, ५ साऊंड सिस्टिम लावणारे, २३ जण अंमली पदार्थाचे सेवन करणारे, या फार्म हाऊसवर काम करणारे, बार टेंडर काम करणारे अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे खालील प्रमाणे  
१) यश राजा चौधरी, (वय २६ वर्षे, धंदा इव्हेंट मॅनेजमेंट, रा. बी ७, देवलिंग सोसायटी, फेज १, गावडे पेट्रोलपंपाजवळ, चिंचवड, पुणे. २) पैमन सैफ शेख, (वय २७ वर्षे, धंदा इव्हेंट मॅनेजमेंट, रा. एफ १, १८ हिलमिस्ट, गार्डन, कौसरबाग, कोंढवा), ३) सैफ आसिफ सय्यद, (वय ३० वर्षे, रा. सिटी टॉवर्स, फ्लॅट नं ३०५, तिसरा मजला, कौसरबाग, कोंढवा), ४) सिध्दांत संतोष धुवाडी (वय २९ वर्षे, रा. क्लाऊड ९, युनिट १२५, एन आय बी एम. कोंढवा), ५) दिशांत संतोष धुवाडी, (वय २४ वर्षे, रा. क्लाऊड ९, युनिट १२५, एन आय बी एम. कोंढवा), ६) अली रौफ पानसरे (वय २७ वर्षे, रा. क्लाऊड ९. युनिट १२५, एन आय बी एम. कोंढवा), ७) आवेश समशुलहक अन्सारी, (वय २५ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. बिल्डींग नं ए २८ रुम नं १०५, विंन्देश्वरी बिल्डींग, ९० फिट रोड, धारावी, मुंबई व सध्या रा. स्काय हाईट्स बिल्डींग, ४ था मजला, फ्लॅट नं ४०३, एन आय बी एम रोड, कोंढवा), ८) रविंद्र हनुमंत पालेम वय ४२ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. ताडीवाला रोड, बंडगार्डन, ९) दुर्वेश रामचंद्र सर्वगोड, वय ४१ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. १३. ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे, १०) अनिल अरुण चव्हाण वय ४३ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. रायसोनी पार्क, मार्केटयार्ड, शेवटचा बसस्टॉप, पुणे, ११) अभिषेक नागनाथ पायाळ वय २८ वर्षे, धंदा  बाऊंसर, रा. शिवनेरीनगर कोंढवा, पुणे, १२) विकी अनिल कदम वय ३५ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. ससाणेनगर, हडपसर पुणे,१३) रहीम कादर तोडगल वय ३५ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. खडकी बाजार, खडकी, १४) आकाश बाबासो इंगळे वय २७ वर्षे, धंदा शिरुर, जि. पुणे, बाऊंसर, रा. तळेगांव रोड, शिक्रापुर, १५) गुरप्पा यश कुशलकर वय ४५ वर्षे, धंदा झोपडपट्टी, एन आय बी एम रोड, कोंढवा पुणे, बाऊंसर, रा. जोगेश्वरी, मुंबई, १६) सागर दत्तात्रय गरुडपाटील वय ३७ वर्षे, आय बी एम रोड, कोंढवा, १७) आकाश मधुकर साळवे वय २६ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. लंन नं, १२, थिटे वस्ती, खराडी, १८) अनिकेत अशोक आखाडे वय २७ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवनासमोर कॅम्प, १९) आंनद विश्वनाथ बिमाडे वय २७ वर्षे, रा. आव्हाळवाडी गावठाण, वाघोली, २०) आत्माराम मधुकर दहीफळे वय २७ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. आव्हाळवाडी गावठाण, वाघोली, २१) वेदांत राजेंद्र जाधव वय २१ वर्षे, धंदा बाऊंसर, रा. पाटस कोळपेवस्ती, ता. दौंड, जि. पुणे, २२) आनंद वसंतराव भागरटकर वय ३१ वर्षे धंदा दत्तगंदीर चौकाजवळ, विमाननगर, २३) साहिल कुरबानी, २४) साहिल पंजाबी, २५) विक्रांत खंडारी २६) सुरज चंद्रकांत पोकळे, वय २९ वर्षे, धंदा साऊंड व्यवसाय, रा. फ्लॅट नं ६. ३ रा मजला, गणेशनगर, मुक्ताई पॅलेस, धायरी, २७) आशिष राजेश रेड्डी, वय २६ वर्षे, धंदा साऊंड व्यवसाय रा. संकेत विहार, लेन नं ११, ड्रिम आकृती जवळ, हडपसर, २८) ऋषिकेश विजय पाटील, वय २४ वर्षे, रा. फ्लॅट नं ३०३, यशिका अपार्टमेंट, समर्थनगर, दिघी, २९) हरीओम दत्तात्रय फडतरे वय २२ वर्षे, रा. स.नं४, हरीओम निवास, आळंदी रोड, समर्थनगर, दिघी, ३०) विनायक विजय पवार वय २८ वर्षे रा, डी ९०३, सी १, ट्रायडन्ट सिटी च-होली, ३१) पियुश राजेश रामनानी वय २५ वर्षे, रा. बी/१, हायफेज सोसायटी, पिंपळे सौदागर, ३२) सुयश देवंद्रकुमार त्रिवेदी वय २५ वर्षे रा, फ्लॅट नं ६ आॅर्केड सोसायटी, लेन नं ९, धानोरकर कॉलनी कोथरुड, ३३) आश्रफ बादशहा शेख वय २३ वर्षे, रा. कस्पटेवस्ती, पुणे, ३४) क्रिश मनोज मेहता वय २६ रा, १२०२ स्काय वेलवेडर सोसायटी सोपान बाग,
३५) आश्रय मनिष जैन वय २६ रा, सी ६०४, कुमार पुरम मुकुंदनगर, ३६) नमन विजय सांधवी वय २४ वर्षे रा, शत्रुजय सोसायटी, सी २२०१, बिबवेवाडी मार्केटयार्ड, ३७) जीत भाग्य शहा वय २७ वर्षे रा, एच १४७ पदमावतीनगर, सोसायटी, धनकवडी, ३८) साहील संजय ढोले वय २६ रा, हरिप्रसाद बी-२०३ सिंहगड रोड, ३९) सार्थक अनिल डोरा वय २६ रा, फ्लॅट नं ५. सी बी कॉर्नर टिंगरेनगर, ४०) अनिकेत महेद्र कश्यप ऊर्फ फैजल सोहेल वय २८ वर्षे, रा. ब्रम्हाकॉप्स सोसायटी, वडगाव शेरी, ४१) हर्षद राश जैन वय २२ वर्षे रा, ब्रम्हा नेक्ट फ्लॅट नं ७ गोखलेनगर,४२) शुभ अनिल गुप्ता वय २६ वर्षे रा. काश्मीरी कॉलनी लोहगाव, ४३) निलेश कुमार मिश्रा वय ३३ वर्षे रा, फ्लॅट नं ११०४, मेगा पॉलीस हिंजवडी, ४४) अदिक उत्तम गुसाई वय २२ वर्षे रा. एकता विहार फ्लॅट नं ३०२, गोखलेनगर, ४५) दुर्गेश नाना शेंदाने वय ३१ रा, बी २०३, साईप्रसाद वडगाव सिंहगड रोड, ४६) संकेत अनिल पाटने वय २२ वर्षे रा, कुमार पॅपलॉन सुतारवाडी, पाषाण,
४७) जैविक सैदरभाई सुदाने वय ३४ रा. उंड्री, ४८) साहिल प्रज्योत दोषी रा. एस.बी रोड, ४९) अभिषेक मुलाकरी गिरी वय २७ वर्षे रा. सुतारवाडी पाषाण, ५०) शैलेन्द्र राजेश ध्यानी वय २४ वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, बावधन, ५१) गौरव दयाल पोलानी वय २३ वर्षे, रा. अशोक थेटर पिंपरी, ५२) स्वरण मनोज फरसवाणी वय २४ वर्षे, रा. फ्लॅट नं. १. सिंधी कॉलनी, आजना रोड, छत्रपती संभाजीनगर, ५३) फार्म मालक नरेंद्र सुंदरलाल चुघ, ५४) अन्सार मुनिर शेख वय २४ वर्षे, धंदा लाईटमन, रा. नुर बिल्डिंग, आर के चौक, लक्ष्मीनगर, येरवडा,
५५) रोहन हरीश्चंद्र अडागळे वय २८ वर्षे, रा. ५७६, काशेवाडी, भवानीपेठ, पुणे, ५६) विशाल गोविंद शर्मा वय २३ वर्षे, रा. रामनगर, जि. नैनीताल, उत्तराखंड, ५७) लोकेंदर चंदरसिंह वय २५ वर्षे, रा. सरस्वती कृपा हौसिंग सोसायटी ताडीवाला रोड, ५८) बिस्वास विनय बिस्वास वय ३१ वर्षे, रा. राजबहादुर मिल हॉटेल, बंडगार्डन, ५९) बिर रुद्र तिरुवल वय ३२ वर्षे, रा. स्काय हाईट्स, फ्लॅट नं. ४०३, एनआयबीएम रोड, ६०) सोहेल समशाद खान वय २२ वर्षे, रा. लेन नं. २२, ईमाम मस्जिद, ताडीवाला रोड, ६१) विकास फेकु बजीयार वय ३२ वर्षे, रा. लेन नं. २२, ताडीवाला रोड, ६२) जेरुल ईस्लाम अस्मतअली वय १९ वर्षे, रा. ताडीवाला रोड, ६३) संजय रमेश महाराणा वय २८ वर्षे, रा. सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड पुणे,
६४) साहील हनीफ अख्तर वय २४ वर्षे, रा. सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड, ६५) जिया उर सिराजुद्दीन रेहमान वय २१ वर्षे, रा. लेन नं. ३४, ताडीवाला रोड, ६६) नवनीत भगवती बडौनी वय ३२ वर्षे, रा. बी, बलेफ, फ्लॅट नं. १०१, पहीला मजला बालेवाडी, ६७) साबीर अहमद नाजुमुद्दीन वय २१ वर्षे, रा. लेन नं. ३४, ताडीवाला रोड, ६८) बशीरसाहब छबु मुल्ला वय ३० वर्षे, रा. अक्कलकोट, ६९) हीतेश सुनिल चनाल वय २१ वर्षे, रा. रेणुका अपार्टमेंट, फ्लॅट नं. ७. दळवीनगर, ७०) तरबेज मोहम्मद शेख वय २१ वर्षे, रा. काशेवाडी, ७१) कैफ ईस्ताप शेख वय २३ वर्षे, रा. काशेवाडी, ७२) वैभव विजय माने वय १९ वर्षे, रा. वैभव मेडीकलजवळ, गांधीनगर, ७३) प्रथमेश पांडुरंग माने वय १९ वर्षे, रा. वैभव मेडीकलजवळ, गांधीनगर पुणे, ७४) अक्षय बाबु माने वय १९ वर्षे, रा. वैभव मेडीकलजवळ, गांधीनगर, ७५) रोशन बारकु माने वय २१ वर्षे, रा. वैभव मेडीकलजवळ, गांधीनगर, ७६) बापु अंकुश सोनवणे वय ४५ वर्षे, रा. स.नं. १४, जय जवान नगर, येरवडा, ७७) हावण्णा नागेश इंगळे वय २९ वर्षे, रा. गुलबर्गा कर्नाटक, ७८) सागर अविनाश शेलार वय ३० वर्षे, रा. हीना हेरिटेज, फ्लॅट नं. १०४, काळेवाडी)

You may have missed