Pune Navle Bridge Accident | नवले पुल परिसरात सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यु; मिक्सर ट्रक अंगावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यु

Pune Navle Bridge Accident | Two-wheeler rider dies after cement mixer overturns near Navle Bridge; youth killed instantly as the mixer truck falls on him.

पुणे : Pune Navle Bridge Accident | कात्रज ते बावधन या मार्गावर भरधाव जाणारा १६ चाकी मिक्सर वळणावर नियंत्रण सुटून तो उलटला.  त्याखाली दुचाकीस्वार सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नवले पुल चौकात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

https://www.instagram.com/p/DZZPpORpaJr

रामेश्वर मच्छिंद भोगले (वय ३१, सध्या रा. वाघजाईनगर, कात्रज, मूळ रा. सांगवी, हाजीपूर, जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात सिमेंट मिक्सर चालक गोरख लक्ष्मण रनसुरे (वय ५०, रा. काळभोर बिल्डींग, लोणी रेल्वे स्थानकाजवळ, लोणी काळभोर) हा किरकोळ जखमी झाल्याची माहिती नर्‍हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरातून सिमेंट मिक्सर बुधवारी (१० जून) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईकडे निघाला होता. तेथील वळणावर मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटले आणि १६ चाकी मिक्सर उलटला. त्यावेळी तेथून निघालेले दुचाकीस्वार रामेश्वर भोगले हे मिक्सरच्या चाकाखाली सापडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. सिमेंट मिक्सर उलटल्यानंतर चालक रनसुरे याच्या डोक्याला दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. अपघातात  मिक्सर चालक रनसुरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ बाह्यवळण मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर क्रेनच्या सहाय्याने  बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली.

You may have missed