Pune Crime News | डिलिव्हरी बॉयच्या खिशातून जबरदस्तीने रोकड, मोबाईल चोरुन नेणार्‍या मोक्का, एमपीडीए खाली कारवाई झालेल्या दोघा सराईत गुंडांना बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | बिबवेवाडी परिसरात दहशत माजवून डिलिव्हरी बॉयच्या खिशातून जबरदस्तीने रोकड व मोबाईल काढून घेणार्‍या मोक्का, एमपीडीए खाली कारवाई झालेल्या दोघा सराईत गुंडांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

केतन शाम टेमकर Ketan Sham Temkar (वय २३) आणि खुशाल ऊर्फ दादया शिंदे Khushal, alias Dadaya Shinde (वय २४, दोघे रा. राजीव गांधी नगर, अपर बिबवेवाडी) अशी या गुंडांची नावे आहेत. याबाबत अनिकेत हरिदास लोहार (वय २४, रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी येथील राजीव गांधीनगर येथे ८ जून रोजी रात्री पावणेबारा वाजता घडली.

अनिकेत लोहार हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. अप्पर बिबवेवाडीतील राजीव गांधीनगर येथील राजगड चाळ परिसरात ते डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी केतन टेमकर, खुशाल शिंदे यांनी त्यांना अडवले. त्यांच्या खिशातील ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेऊन केतन टेमकर हा त्यांच्या दुचाकीवर बसला. आरडाओरडा करुन नकोस नाही तर तुझे काम होईल, असे म्हणून त्यांना दोन तीन गल्ल्यांमध्ये फिरवून चल निघून जा अशी धमकी देऊन त्यांना हकलले. त्यांनी बिववेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे व त्यांचे सहकारी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हे दोघे संशयित दिसून आले. पोलिसांनी परिसरातील गल्ल्यांमध्ये यांचा शोध घेऊन काही तासात दोघांना अटक केली आहे.

केतन टेमकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे आहेत. त्याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती. खुशाल शिंदे याच्यावरही अनेक गुन्हे दाखल असून परिसरात तो दहशत माजवत असल्याने त्याच्यावर यापूर्वी एमपीडीए अन्वये कारवाई करुन त्याला एक वर्ष तुरुंगात स्थानबद्ध केले होते. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करीत आहेत.

You may have missed