Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे : Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि स्वस्तिक इको एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत भविष्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या अभियानात गुड मॉर्निंग ग्रुप, कात्रज तसेच एच. व्ही. देसाई कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स सेंटर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. नदी स्वच्छतेच्या या उपक्रमात तब्बल ७३ पर्यावरणप्रेमींनी सहभागी होत मुठा नदीपात्रातील कचरा हटविण्यासाठी श्रमदान केले.
पर्यावरण संवर्धन आणि नदी स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचला. सहभागी स्वयंसेवकांनी भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
आयोजकांनी सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
