Pune Crime News | मैत्रिणीवरुन झालेल्या भांडणाच्या कारणावरुन डोक्यात बेसबॉलच्या स्टीकने मारुन मित्राचा खुन करणार्‍या तिघांना अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मैत्रिणीवरुन झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर बेसबॉलच्या स्टीकने कानावर मारहाण करुन त्याचा खुन करणाऱ्या  तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी नवी मुंबईतील रबाळे येथून अटक केली आहे.

हर्षद मच्छिंद्र जाधव (वय २०, रा. गोखलेनगर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची आई पोर्णिमा जाधव (वय ४०) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिषेक संतोष पवार Abhishek Santosh Pawar (वय २०), प्रथमेश बाबु धोत्रे Prathamesh Babu Dhotre (वय २१) आणि मारुती बाबु देवकर Maruti Babu Devkar (वय २८, सर्व रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) यांना अटक केली आहे. ही घटना गोखलेनगरमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद जाधव याच्यावर कोरेगाव पार्क येरवडा, आळंदी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. हर्षद आणि अभिषेक पवार हे जवळचे मित्र होते. त्यांची एक मैत्रिण आहे़ या मैत्रिणीवरुन त्यांच्यात १२ जून रोजी भांडणे झाली होती. त्यावेळी हर्षद याने त्यांना मारहाण केली होती.

हर्षद जाधव हा रात्री उशिरापर्यंत रिक्षामध्ये बसून मोबाईलवर गेम खेळत बसलेला असतो. अनेकदा त्याचे मित्र ही असतात. त्यामुळे हर्षदची आरोपींना माहिती होती. नेहमीप्रमाणे हर्षद हा रिक्षामध्ये बसला होता. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पाच जण आले. त्यांनी रिक्षा बसलेल्या हर्षदला बाहेर ओढून त्याला दांडके,  बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केली. त्यातील एक फटका त्याच्या कानावर जोरात बसला. कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. ते पाहून हल्लेखोर पळून गेले.  

हर्षद याचा आरडा ओरडा ऐकून लोक जमा झाले. त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. परंतु, उपचार सुरु करत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना घडली, तेथे सीसीटीव्ही नव्हते. लोकांकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी तांत्रिक तपासावरुन तिघे जण नवी मुंबईतील रबाळे येथे असल्याचे दिसून आले़ त्यावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़  पोलीस निरीक्षक शितल जाधव तपास करीत आहेत.

You may have missed