Pune Crime News । पुणे : पिस्टल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील टोळीला पकडून येरवडा पोलिसांनी केले पिस्टल व जिवंत काडतुस जप्त
पुणे : Pune Crime News । आर्म अॅक्टसह विविध गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची टोळी पिस्टलसह थांबली असल्याच्या बातमीवरुन येरवडा पोलिसांनी तिघांना पकडले.
महेश अशोक कांबळे Mahesh Ashok Kamble (वय २१, रा. प्रज्ञा अपार्टमेंट, हिरा गार्डन, भुगाव), गणेश तुळशीराम पवार Ganesh Tulshiram Pawar (वय २२, रा. समर्थ रेसिडेन्सी, लगड कॉलनी, नांदेड सिटी) आणि यश चंद्रकांत उरणकर Yash Chandrakant Urankar(वय २२, रा. पॉप्युलर टॉवर, संभाजी चोक, पाषाण) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचे १ देशी पिस्टल, ८०० रुपयांचे १ जिवंत राऊंड, दुचाकी असा ९० हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
महेश कांबळे याच्याविरुद्ध नर्हे पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, तसेच गणेश पवार याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये खुनाचा प्रयत्न, तसेच मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाले आहेत.
येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक २८ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार बालाजी सोगे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, तिघे जण चव्हाण चौकातून मुळीक फॉर्म कडील रोडवर मोकळ्या जागेत थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केल्यावर तिघे जण थांबलेले दिसून आले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतुस मिळून आले. पिस्टल विक्री करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, संदिप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, सोमनाथ गायकवाड यांनी केली आहे.
