Pune Rain Update । भारती हॉस्पिटल आवारातील सीमा भिंत कोसळून 50 ते 60 दुचाकींचे नुकसान

Pune Rain Update | 50 to 60 two-wheelers damaged as the boundary wall of Bharati Hospital premises collapses

पुणे : Pune Rain Update । धनकवडी येथील भारती हॉस्पिटलच्या आवारातील सीमा भिंत शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कोसळली. त्याखाली अडकल्याने ५० ते ६० दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.

भारती हॉस्पिटलच्या आवारातील ही सीमा भिंत २२ फुट उंच व १०० फुट लांब होती. वरच्या बाजूने भिंतीत पाणी मुरल्याने ती फुगली होती. भिंतीच्या खालच्या बाजूला खड्ड्यात हॉस्पिटलमधील स्टाफ आपल्या दुचाकी गाड्या पार्क करतात. सकाळी साडेदहा वाजता ही भिंत कोसळली. त्यावेळी तेथे कोणी नव्हते. मात्र, भिंतीच्या मलब्याखाली ५० ते ६० दुचाकी अडकल्या आहेत. या बाजूला असलेली दुसरी सीमा भिंतही कमकुवत झाली असून ती एका बाजूला कललेली आहे. असे अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी वसंत भिलारे यांनी सांगितले.

You may have missed