Deccan Education Society New English Medium School । दप्तराविना शाळा उपक्रमात भातुकलीतून आनंददायी शिक्षण

Deccan Education Society New English Medium School | Enjoyable learning through play in the school initiative without textbooks

पुणे : Deccan Education Society New English Medium School । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ येथील पूर्व प्राथमिक विभागात शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी भातुकलीचा खेळ मांडण्यात आला होता. भातुकलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध भांड्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाजी धुणे, सोलणे, किसणे, चिरणे, पुरी लाटणे, दाणे कुटणे अशा विविध सोप्या क्रिया आनंदाने केल्या.

या कृतीशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध वस्तू व कृतींची ओळख झाली. तसेच त्यांची शब्दसंपत्ती वाढण्यास आणि सूक्ष्म स्नायूंच्या विकासास मदत झाली. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेच्या मुख्याध्यापक शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

You may have missed