Pune Crime News | पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून सिंहगड रोड पोलिसांनी एक पिस्टल व जिवंत काडतुस केले जप्त

Pune Crime News | Pune: Singhagad Road police caught a criminal with a record and seized a pistol and a live cartridge

पुणे : Pune Crime News |  खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यापासून हाणामारीचे गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून सिंहगड रोड पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.

https://www.instagram.com/reel/DblTJnfp7am

यश ऊर्फ दादया कमलाकर घोलप Yash alias Dadya Kamlakar Gholap (वय १८, रा. आझाद मित्र मंडळाजवळ, चरवडवस्ती, वडगाव व गावडे बिल्डिंग, जाधवनगर, वडगाव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथक ३० जुलै रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विनायक मोहिते, सागर शेडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार दादया घोलप याच्याकडे एक गावठी पिस्टल असून तो सनसिटी रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे टी शर्ट व ट्रॅकपॅन्ट घातलेला घोलप उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो काहीतरी गुन्हा करण्यासाठी थांबला असल्याचे लक्षात आल्यावर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपयांचे गावठी पिस्टल व १ हजार रुपयांचे जिवंत काडतुस आढळून आले. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, संदिप कांबळे, समीर माळवदकर, तानाजी सागर, शिरीष गावंडे यांनी केली आहे.

You may have missed