Pune Crime News | पुणे : अल्पवयीन युवतीला पंजाबमधून पळवुन आणून धर्मांतराचा प्रयत्न; फुरसुंगी पोलिसांनी धर्मस्वातंत्र्य कायद्याखाली मोहम्मद रईस रफीक शेखला केली अटक  

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पंजाबमधील लुधियाना शहरातील एका अल्पवयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पुण्यात आणले. या युवतीला विवाह करण्याचे आमिष दाखवून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी धर्मस्वातंत्र्य कायद्याखाली एका तरुणाला अटक केली आहे.

मोहम्मद रईस रफीक शेख Mohammad Rais Rafiq Sheikh (वय २१, रा. फिरोजपूर, मलिहाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत लुधियानमधील मुलीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मुळचे उत्तर प्रदेशातील फिरोजपूर येथील राहणारे आहेत. कामानिमित्त ते गेली १६ वर्षे लुधियाना येथे राहतात. त्यांची १७ वर्षाची मुलगी १४ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेत जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती. मुलगी घरी न परतल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी लुधियानातील सराभानगर पोलीस ठाण्यात दिली. जवळपास गेले वर्षभर ते तिचा शोध घेत होते. ३० जुलै २०२६ रोजी त्यांच्या मुलीने फिर्यादी यांची पत्नी व मुलीची आई हिला फोन करुन ती सध्या फिरोजपूर येथील मोहम्मद शेख याच्यासोबत हांडेवाडी रोड पुणे येथे रहात असल्याचे सांगून लोकेशन पाठविले. तिला घ्यायला या असे तिने सांगितले. त्याप्रमाणे ते ४ ऑगस्ट २०२६ रोजी चुलत भावाला घेऊन फुरसुंगी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी मुलीला शोधण्याकरीता पोलीसांची मदत मागितली.

पोलिसांच्या मदतीने मुलगी आणि आरोपी शेख याला पोलीस ठाण्यात आणले. शेखने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुझे शिक्षण पूर्ण करतो, असे अमिष दाखविले. त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुला धर्म बदलावा लागेल, असे मुलीने कुटुंबीयांना सांगितले.

पंजाबमधून मुलीला पळवून नेल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन अलीगढ, कर्नाटकातील कोलार येथे नेले. गेले दोन महिने आरोपी मुलीसोबत हांडेवाडी येथे राहत होता. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बाल न्यायालयाने तिला निरीक्षणगृह ठेवले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

You may have missed