Pune Crime News | एसआरपीएफच्या ‘भगोडा’ चोरट्याला पकडून त्याच्याकडून 30 लाखांच्या 19 बुलेट केल्या जप्त, 19 गुन्हे आणले उघडकीस

Pune Crime News | Thief from SRPF caught, 19 bullets worth 30 lakh seized from him, 19 cases revealed

पुणे : Pune Crime News |  निळ्या रंगाची जुपिटर गाडीवरुन येणारा चोरटा शहर व परिसरातील बुलेट चोरुन नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन निष्पन्न झाले. बारामती तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या चोरट्याला पकडले. अधिक तपासात तो एसआरपीएफच्या टेक्निकल विंगमधील भगोडा असल्याचे उघडकीस आले.

https://www.instagram.com/p/DcBant_pQne

समाधान बाळू काळे Samadhan Balu Kale (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही फलटण, बारामती, शिरुर परिसरात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

बारामती शहर तसेच तालुका परिसरातून बुलेट चोरीच्या घटना वाढलेल्या दिसून आल्या होत्या. त्यावरुन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सुचना केल्या. बुलेट चोरीला गेलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणून त्या आधारे शोध सुरु केला. त्यात एका निळ्या रंगाच्या जुपिटरवरुन चोरटा येतो व बुलेट चोरुन नेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथके शोध घेत असताना गस्त घालणार्‍या पोलिसांना एक संशयित चोरीची मोटारसायकल घेऊन पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजकडे जाताना दिसला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. समाधान काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने रात्रीच्या वेळी बुलेट चोरुन नेत असल्याची कबुली दिली. तो एकटाच व्ही आय पी नंबर प्लेट असलेल्या बुलेट व इतर मोटारसायकली चोरी केलेल्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा, एस टी महामंडळ असे लोगो लावून चोरी केलेल्या मोटारसायकलचा वापर करुन पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली. त्याने फलटणमधील एका गोदामात लपवुन ठेवलेल्या १९ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. त्यात १३ बुलेटचा समावेश आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अभिजित एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे यांनी केली आहे.