Pune Crime News | पुणे : रीलस्टारवर महिला रीलस्टार गटाकडून खुनी हल्ला ! पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फ्लाईंग जिप्सी हॉटेलचा मालक हेमंत पाटील, मॅनेजर प्रेम पाटील यांना अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फ्लाईंग जिप्सी हॉटेलवर डेक्कन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हॉटेल मालक व मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे.

हॉटेल मालक हेमंत आनंद पाटील Hemant Anand Patil (वय ४२, रा. धायरी) आणि हॉटेल मॅनेजर प्रेम पाटील Prem Patil – Manager Flying Gypsy Cafe (वय २३, रा. फ्लाईंग जिप्सी हॉटेल, शिरोळे रोड, मुळ रा. ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हॉटेल फ्लाईंग जिप्सी येथे पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत डेक्कन पोलिसांनी माधवी कुंभारसह ७ जणांना अटक केली आहे. या घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये रक्त सांडलेले होते. हे रक्ताचे डाग हॉटेल मालक हेमंत पाटील व प्रेम पाटील यांनी तातडीने धुवून टाकले. त्यामुळे पोलीस तपासात अडथळा आला असून पुरावा नष्ट केल्याचा आरोप या दोघांवर पोलिसांनी ठेवला आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात नेले जाणार आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी या बाबत कडक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली आहे.

बंगल्याच्या आवारात हॉटेल सुरु करुन महापालिकेच्या नियमावलीचे उल्लंघन करणे, मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरु ठेवणे, रात्रपाळीत गस्त घालणार्‍या पोलिसांनी कारवाई केल्यास त्यांना दाद न देणे, असे प्रकार या हॉटेल मालकाने यापूर्वी केले आहेत. त्यामुळे महापालिकेने हॉटेलवर कारवाई करुन त्याला सील ठोकले आहे़

You may have missed