Pune Crime News | ‘आपण एकाच वस्तीत राहणारे असताना आमच्या विरोधकांचे स्टेटस का ठेवतो’; 17 वर्षाच्या युवकाच्या डोक्यात हातोडीने मारुन निर्घुण खुन

Pune Crime News | ‘Why do you put our rivals' status when we live in the same colony?’; Brutally murdered a 17-year-old boy by hitting him on the head with a hammer

कोथरुड पोलिसांनी दोघा अल्पवयीनांना घेतले ताब्यात, कोथरुडमधील एआरएआय टेकडीवरील घटना

पुणे : Pune Crime News | आपण एकाच वस्तीत राहणारे असताना ते आम्हाला मारहाण करुन जेलमध्ये गेले तरी तू त्यांचे स्टेटस का ठेवतो, या कारणावरुन दोघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या युवकाच्या डोक्यात हातोडीने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. कोथरुड येथील एआरएआय येथील टेकडीवरील जंगलात मंगळवारी रात्री ही घटना घडली.

नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरुड) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. कोथरुड पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एआरएआय टेकडीवर दररोज सकाळी फिरायला येणार्‍या लोकांना टेकडीवरील जंगलात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी सकाळी साडेसहा वाजता ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यात डोक्यात मारहाण झाल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी मृताची माहिती सर्वत्र दिल्यानंतर तो नील विजय नाईक याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. नील नाईक व आरोपी हे अल्पवयीन असून एकाच वस्तीत राहतात. आरोपी व त्यांच्याविरोधातील मुलांमध्ये यापूर्वी भांडणे झाली होती. ती मुले सध्या कारागृहात आहेत. नील नाईक याची त्या मुलांबरोबर ओळख होती. त्याने त्यांचे व्हॉटसअ‍ॅपला स्टेटस ठेवले होते. तेव्हा आरोपी मुलांनी नील नाईक याला म्हणाले की, आपण एकाच वस्तीत राहतो, असे असताना तु आम्हाला मारहाण करुन जेलमध्ये गेलेल्यांचे स्टेटस का ठेवतो. यावरुन त्यांच्यात मंगळवारी वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात समेट होऊन ते फिरायला गेले. रात्री दोघे जण नील नाईक याला घेऊन एआरएआय येथील टेकडीवरील जंगलात आले. तेथे त्यांनी हातोडीने त्याच्या डोक्यात वार करुन त्याचा खुन केला. कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करीत आहेत.

You may have missed