Daund Pune Crime News | शिवी दिल्याच्या कारणावरुन वृद्ध महिलेच्या घरात शिरुन खुन करुन धडापासून मुंडके नेले कापून; दौंडमधील धक्कादायक घटनेत पोलिसांनी दोघांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Daund Pune Crime News | ७० वर्षाच्या वृद्ध महिलेने शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरुन तिच्या घरात शिरुन तिचा दोघांनी खुन केला. त्यानंतर तिचे धडापासून तिचे मुंडके कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमध्ये उघडकीस आला आहे. दौंड पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. खुन झालेल्या महिलेला मृतदेह कुजलेल्या स्थिती होता. त्यावरुन हा खुन साधारण रविवारी केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट Vicky alias Vikram Dhanraj Alhat (वय २०, रा. समतानगर, दौंड), आणि प्रसाद बाबुलाल चव्हाण Prasad Babulal Chavan (वय २०, रा. आर बी १ नगर मोरी, दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुमन किसन शिंदे (वय ७०, रा. आर बी १, नगर मोरी, दौंड) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांची विवाहित मुलगी तृप्ती सचिन हिरवे (वय ४५, रा. शिरुर) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन शिंदे यांचे पती किसन शिंदे यांचे १० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तेव्हापासून त्या एकट्याच राहत होत्या. बरेच दिवस त्यांचे घर आतून बंद असल्याचे दिसत होते. त्यामुळे जवळच्या लोकांनी बुधवारी दुपारी पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा ढकलल्यावर तो उघडला. आत सुमन शिंदे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यांचे मुंडके धडापासून कापून वेगळे केलेले होते. शरीरावरील कपडे पाहून हा मृतदेह सुमन शिंदे यांचा असल्याची ओळख पटली. मात्र घरात किंवा परिसरात त्यांचे मुंडके सापडले नाही. पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे तपास करीत आहेत.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले की, सुमन शिंदे या एकट्याच राहत होत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मुंडके दुसरीकडे नेऊन टाकल्याचे दिसून येत आहे. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सुमन शिंदे यांना रविवारनंतर त्यांना पाहिले नव्हते. आरोपी यांच्याबरोबर त्यांचे काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्यावेळी या महिलेने त्यांना शिवीगाळ केली होती. या किरकोळ वादातून या दोघांनी त्यांचा खुन केला आहे. या दोघांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन त्यांनी या महिलेचे शिर कोठे टाकले, याचा तपास करण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, विनायक सपाटे, रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, सहायक फौजदार आसिफ शेख, सचिन घाडगे, पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, नितीन बोराडे, धनंजय गाढवे, निखिल जाधव, आमीर शेख, किरण पांढरे, महेंद्र लोहार, पोलीस अंमलदार पवन माने, सोमनाथ चौंडे, निखील पवार, अक्षय कुंभार, ओमनाथ तुमकुटे, तांबोळी यांनी केली आहे.

You may have missed