Pune PMC News | शहरातील खड्डे युद्ध पातळीवर बुजवा ! अपघातग्रस्त मुलाच्या कुटुंबाला मदतीबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

Pune PMC News

पुणे : Pune PMC News |  शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन एका आठवड्यात खड्डे बुजविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घेतली आहे. या कामाकडे महापालिका आयुक्त स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

चांगल्या कंत्राटदारांची मदत घेऊन काम वेगाने पूर्ण करावे, अटी-शर्तींच्या प्रक्रियेत वेळ न घालवता नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दहा वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबतही महापालिकेकडून कार्यवाही केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने गटनेत्यांची बैठक घेऊन आर्थिक मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भिमाले यांनी दिली.

You may have missed