Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध सुर्वेज ढाब्यावर बाणेर पोलिसांची कारवाई; अवैध दारू जप्त, मालक-मॅनेजर अटकेत

Pune Crime News | Baner police action at famous Surve's Dhaba in Pune; illegal liquor seized, owner-manager arrested

पुणे : Pune Crime News | बाणेर पोलिसांनी पाषाण परिसरातील प्रसिद्ध सुर्वेज ढाब्यावर (Surve’s Dhaba Pashan) कारवाई करत बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप असलेला मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ६१ हजार २२० रुपये किमतीची दारू आणि बिअर जप्त करण्यात आली असून, हॉटेल मालक आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. (Surve’s Pure Non-veg Sutarwadi Pashan Pune)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त आणि अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत सुतारवाडी-पाषाण येथील मुंबई-बेंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या सुर्वेज ढाब्यात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. (Police Raid On Surve’s Dhaba Pashan)

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी खातरजमा करून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सानप आणि त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हॉटेलच्या आतील भागात दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. यावेळी हॉटेल मॅनेजर गोपाल श्रीकृष्ण निचळ Gopal Shrikrishna Nichal (वय ४५, रा. भुगाव, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत एकूण ६१,२२० रुपयांचा कथित अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात मॅनेजर गोपाल निचळ आणि हॉटेल मालक कुणाल सुधाकर गायकवाड Kunal Sudhakar Gaikwad (वय ३९, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त चुलूमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तसेच पोलीस अंमलदार सौरभ पाटील आणि गणेश मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You may have missed