Pune Crime News | पुणे : दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारासह अल्पवयीन गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी 3 पिस्टल, 4 काडतुसे केले जप्त
पुणे : Pune Crime News | कमरेला पिस्टल लावून फिरणार्या दोघा सराईत गुन्हेगार आणि एक अल्पवयीन गुन्हेगारांना पकडून सिंहगड रोड पोलिसांनी ३ पिस्टल व ४ काडतुसे जप्त केली आहेत.
सुरज ऊर्फ चिक्या संतोष गायकवाड Suraj alias Chikya Santosh Gaikwad (वय १८, रा. जाधवनगर, वडगाव) आणि ओमकार ऊर्फ दाद्या अशोक पांढरे Omkar alias Dadya Ashok Pandhare (वय १८, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर ते अल्पवयीन असताना मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार विनायक मोहिते, सागर शेडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन गुन्हेगार वडगाव पठार येथील रेणुकामाता मंदिरासमोरील मोकळ्या जागेत थांबलेले आहे. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे सहकारी तेथे पोहचले. त्यांनी ओमकार पांढरे व सुरज गायकवाड यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता ओमकारकडे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आणि सुरज गायकवाड याच्याकडे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी तपास करीत आहेत.
तपास पथक १९ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार समीर माळवदकर यांना बातमी मिळाली की, वडगाव येथील जाधव प्रवेशद्वार येथे एक जण थांबला असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे. या बातमीची खात्री केली असता तेथे एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे असा ४२ हजार रुपयांचा माल मिळून आला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, प्रवीण कुलकर्णी, सचिनकुमार तरडे, पोलीस अंमलदार उत्तम तारु, अण्णा केकाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, समीर माळवदकर, संदिप कांबळे, तानाजी सागर, शिरीष गावडे यांनी केली आहे.
