Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून चोरट्याने तरुणाच्या मोबाईलवरुन जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करुन लुबाडले

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून पहाटेच्या सुमारास जाणार्‍या तिघा तरुणांकडील मोबाईलवरील फोन पे वरुन पैसे ट्रान्सफर करण्यास लावून जबरदस्तीने लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अक्षयकुमार काशीराम राव (वय २८, रा. सोलापूर रोड, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोलापूर रोडवरील मंम्बा देवी चौकाजवळील नलीनी सोसायटीसमोर रविवारी पहाटे पावणे चार वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे २ मित्र बरोबर जात होते . त्यावेळी दुचाकीवरुन चोरटा आला़. त्याने फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगून दामदाटी केली. फिर्यादी यांच्या २ मित्रांच्या मोबाईलमधील फोन पेवरुन फिर्यादी यांच्या फोन पेवर रक्कम पाठविली. फिर्यादी यांच्या मोबाईलचा पासवर्ड व फोन पेचा पिन नंबर माहिती करुन घेऊन त्यांच्या मोबाईलवरुन ३८ हजार ९०० रुपये ट्रान्सफर करुन त्यांची फसवणूक करुन तो निघून गेला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

You may have missed