Pune Crime News | श्वानास नीट पकडा म्हटल्याने कुत्रा अंगावर सोडल्याने त्याने घेतला पार्श्वभाग, मांडी, गुडघ्याचा चावा, एरंडवणे येथील घटना

Pune Crime News | A dog bit the backside, thigh, and knee after being released onto someone when told to hold it properly, incident at Erandwane

पुणे : Pune Crime News | सकाळी, रात्री उशिरा कुत्र्यांना फिरायला नेण्याच्या नावाखाली असंख्य लोक रस्त्यांवर सर्वत्र घाण करुन ठेवताना दिसतात. कोणी काही बोलले तर त्याच्या अंगावर कुत्री सोडतात, असा प्रकार एरंडवणे येथील गुळवणी महाराज रोडवर घडला. जाणार्‍या मध्यमवयीनाच्या अंगावर कुत्रा धावल्याने त्याने श्वानाला व्यवस्थित पकडा असे सांगितल्याच्या कारणावरुन त्याने कुत्रा अंगावर सोडला. या कुत्र्याने त्यांच्या पार्श्वभागाचा चावा घेतला. तसेच डाव्या पायाच्या  मांडीला व गुडघ्याच्या  मागे चावा घेऊन जखमी केले. ही घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडली.

याबाबत हेमंत किसन फाले (वय ४२, रा. गणेशनगर, ओटा वसाहत, एरंडवणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वेदांत पासलकर (वय २५, रा. गणेशनगर ओटा वसाहत, एरंडवणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत फाले हे रात्री दहा वाजता पायी घरी जात होते. जोशी स्वीटच्या समोरील रस्ता क्रॉस करुन फुटपाथवरुन जात होते. त्यावेळी दोन मुले दोन श्वान घेऊन येत होते. त्यातील काळ्या रंगाचा श्वान त्यांच्या अंगावर धावुन आला. तेव्हा त्यांनी त्याला श्वान व्यवस्थित पकडा, असे सांगितले. त्यावरुन वेदांत पासलकर हा शिवीगाळ करू लागला. ते तेथून पुढे जात असताना पासलकर याने त्यांना थांब तुला दाखवतो, असे म्हणून त्यांच्याकडील काळ्या रंगाचा कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला. त्या कुत्र्याने फिर्यादी यांच्या पार्श्वभागावर, डाव्या पायाच्या  मांडीला व गुडघ्याच्या मागे चावा घेऊन त्यांना जखमी केले. ते धावत घरी गेले. त्यांच्या पत्नीला हे समजल्यावर ती जाब विचारण्यास गेली असता पासलकर याने तिच्याशी वाद घालून तिच्या अंगावर कुत्रा सोडत होता. हे पाहून ते अलंकार पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार दिवेकर तपास करीत आहेत.

You may have missed