Pune Crime News | दोघा गुन्हेगारांकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी 3 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे केले जप्त
पुणे : Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून ३ गावठी बनावटीचे कट्टे व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार Omkar alias Babya Santosh Pawar (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार) आणि शिरीष जितेंद्र खोपडे Shirish Jitendra Khopde (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना बातमीदारामार्फत कात्रज डेअरी चौक ते सरहद् चौक दरम्यान कात्रज डेअरीचे भिंतीलगत एक जण शस्त्रासह थांबला आहे. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन शिरीष खोपडे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसे मिळून आले. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे २६ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यान श्री कोचिंग क्लासेसच्या समोरील गल्लीत ओंकार पवार दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुसे मिळाली़ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे़ दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवि जाधव, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लीकार्जुन कोळी, कृष्णा म्हस्के यांनी केली आहे.
