Pune Police SB-Military Intelligence Operation | लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवरुन पुण्यात छापा; तीन बांगला देशी ताब्यात, विशेष शाखा आणि मिलिटरी इंटेलिजन्सची संयुक्त कारवाई

Pune Police SB-Military Intelligence Operation | Pune Police SB-Military Intelligence Operation Busted Illegal Ring in Pune; 3 Bangladeshi Nationals Apprehended

पुणे : Pune Police SB-Military Intelligence Operation | लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या विशेष शाखा आणि मिलिटरी इंटेलिजन्सने संयुक्त कारवाई करत शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ३ बांगला देशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोनिया अख्तर, मोतिआर गाजी आणि सोनिया मोती पान अशी या बांगला देशी नागरिकांची नावे आहेत. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.

लष्करी इंटेलिजन्सकडे काही बांगला देशी नागरिक बेकायदेशीरपणे शहरात वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. प्राथमिक चौकशी दरम्यान त्यांच्या त्यांच्या भारतातील वास्तव्याबाबत तसेच देशात प्रवेश करण्याच्या मार्गाबाबत माहिती घेण्यात आली. त्यांच्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, तिघांविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानंतर त्यांना बांगला देशात परत पाठवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

शहरातील संवेदनशील भागांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास आणि पडताळणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. वैध कागदपत्रांशिवाय शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

You may have missed