Pune Crime News | शिवाजीनगरमध्ये एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक; 1.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News | Young man arrested with MD drugs in Shivajinagar; property worth 1.52 lakh seized

पुणे : Pune Crime News |  मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने एका एका तरुणाला शिवाजीनगर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रॉनसह स्कूटर आणि मोबाईल असा एकूण १ लाख ५२ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आसिफ अब्दुल शेख Asif Abdul Shaikh (वय २६, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना पोलीस अंमलदार तुषार साळुंखे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आसिफ शेख हा मेफेड्रॉन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.

पोलिसांनी २७ ऑगस्टच्या रात्रीपासून २८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत शिवाजीनगर येथील संचेती चौक परिसरातील आंबेडकर रोडवरील टाटा टेलिबिझनेस सर्व्हिसेस इमारतीसमोर पाळत ठेवली. पहाटे सुमारे ५.२७ वाजता आसिफ शेख हा सुझुकी स्कूटरवरून तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे २७ हजार ६६० रुपये किमतीचे ९.२२ ग्रॅम मेफेड्रॉन, सुझुकी कंपनीची बर्गमॅन स्कूटर आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५२ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) हसन गौहर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक पोलीस फौजदार विठ्ठल साळुंखे तसेच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

You may have missed