Pune Crime News | घरफोडीतील जप्त केलेला 52 लाखांचा ऐवज 3 महिन्यात मुळ मालकाला केला परत

Pune Crime News | Loot worth 52 lakh recovered from a house burglary returned to its original owner in 3 months

पुणे : Pune Crime News |  समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ घरफोडीच्या गुन्ह्यातील दिल्लीकडील दोन गुन्हेगारांना विश्रामबाग पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ५२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला होता. न्यायालयाची सर्व कायदेशीर पुर्तता करुन या मुळ घरमालकांना अवघ्या ३ महिन्यांच्या आत हा ऐवज सुपूर्द करण्यात आला. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या हस्ते  दोन कुटुंबियांना ४५ लाख व ७ लाख रुपयांचा ऐवज परत केला गेला.

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडले होते. याचा तपास करीत असताना समर्थ व विश्रामबाग पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आरोपी हे दिल्लीकडील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांचा शोध घेत असताना ते पुण्यात असून बंडगार्डन परिसरातील लॉजमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन विश्रामबाग पोलिसांनी दोघा आरोपींना पकडले. त्यांच्याकडून सोन्या चांदी व मोत्यांचे दागिने असा ५२ लाखांचा ऐवज जप्त केला. सर्व कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन आरोपींना अटक केल्यानंतर ३ महिन्यांच्या आत सर्व परवानग्या मिळुन पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या हस्ते बुधवारी मुळ मालकाला हा ऐवज परत करण्यात आला. चोरीला गेलेला मौल्यवान ऐवज पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे परत मिळाल्याने या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.

You may have missed