Wakad Pune Crime News | फॉर्च्युनरची नंबरप्लेट झाकणार्‍या मालकाला वाकड पोलिसांनी केली अटक; नंबरप्लेट उघडझाप करणारी यंत्रणा बसविलेली फॉर्च्युनर केली जप्त

Wakad Pune Crime News | Wakad police arrested the owner who was hiding the Fortuner's number plate; the Fortuner fitted with a device to reveal the number plate was seized

पुणे : Wakad Pune Crime News | रस्त्याने जात असताना अचानक फॉर्च्युनरची नंबरप्लेट झाकली जात असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी या फॉर्च्युनरच्या मालकाला अटक केली आहे.

विजय भगवान दगडे Vijay Bhagwan Dagade (वय ४४, रा. नरसिंह मंदिराजवळ, ताथवडे, ता. मुळशी) असे फॉर्च्युनरच्या मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दगडे यांनी त्यांच्या टोयोटा कंपनीच्या फॉर्च्युनर कारच्या पाठीमागील बाजुच्या नंबरप्लेटवर आरटीओच्या परवानगीशिवाय नंबर प्लेट दिसू नये, अशा उद्देशाने नंबर प्लेट लपविण्याचे दृष्टीने बनावटीकरण करुन काहीतरी यांत्रिक फ्लिपिंग (उघडझाप करणारी) यंत्रणा बसवुन घेतली होती. ते गाडी घेऊन जात असताना पाठीमागील वाहनातील लोकांना अचानक नंबरप्लेट दिसेनाशी होत असल्याचे दिसून आले. त्यांनी याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला जात असल्याने तो काही वेळातच व्हायरल झाला. त्यामुळे वाकड पोलिसांनी या वाहनाच्या नंबरप्लेटवरुन विजय दगडे याला फॉर्च्युनरसह पकडले. त्याने नंबरप्लेटमध्ये बनावटीकरण केल्याची कबुली दिली.

वाहतूक शाखेचे चलन होऊ नये, आरटीओ स्पिडिंग कॅमेरे पोलीस नाकाबंदी, दंडात्मक / कायदेशीर कारवाई टाळण्याच्या उद्देशाने तसेच  एखादा गंभीर स्वरुपाचा अपराध करुन त्यापासून स्वत:चे अस्तित्व लपण्यासाठी हा प्रकार केला. पोलीस वाहनापर्यंंत पोहचु नये, या उद्देशाने हा प्रकार केल्याचे समोर आले. याद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करुन गुरुवारी दुपारी विजय दगडे अटक केली. त्यानंतर काही वेळातच त्याला शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दिप्ती पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील यांनी सांगितले की, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते असा गुन्हा पुन्हा करण्याची शक्यता आहे. साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. ऋषिकेश ताटे यांनी युक्तीवाद केला. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीची प्रत्यक्ष पोलीस कोठडीची गरज नाही. पोलिसांनी वाहन जप्त केले आहे. आरोपीला कोठडीत ठेवण्यामागे काहीही कारण नाही. त्यानंतर न्यायालयाने विजय दगडे याची २५ हजार रुपयांच्या बाँडवर जामिनावर सुटका केली.

याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले की, आरोपी याची फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. त्याने नंबरप्लेटमध्ये यांत्रिकी पद्धतीने कोठे व कोणाकडून बदल करवुन घेतला आहे. त्याने अशा प्रकारे आणखी किती वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये बदल करवुन दिला आहे, याचा तपास करण्यात येत आहे.

You may have missed