Pune Crime News | धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तलवार व फायटरने एकमेकांना मारहाण करणाऱ्या टोळक्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Lakshminagar police busted a gang where two groups attacked each other with swords and fighters over a dispute.

पुणे : Pune Crime News | धक्का लागल्याच्या कारणावरुन डायमंड चौकात दोन गटात हाणामारी झाली. त्यात तलवार व फायटरचा वापर करुन एकमेकांना मारहाण करणार्‍या टोळक्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे़

शिवम राजू ढेंबरे Shivam Raju Dhembre (वय २२, रा. चंद्रमानगर, प्रतिकनगर, येरवडा), शुभम वशिष्ठ तिवारी Shubham Vashishth Tiwari (वय २२, रा. मित्तल सोसायटी, प्रतिकनगर, येरवडा), सोहेल समीर खान Sohail Sameer Khan (वय २२, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा), शुभम शाम पोळ Shubham Sham Pol (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा), साहिल समीर खान Sahil Sameer Khan (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राजू राहुल जाधव, ऋषिकेश देवदास जाधव, लखन कांबळे  (तिघे रा. भोसले वस्ती, येरवडा), शाहरुख शेख (रा. यशवंत नगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार किरण शंकर भागीत (वय ३८) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नवी खडकीतील डायमंड चौक येथील नवज्योत मित्र मंडळाजवळ १४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ते डायमंड चौकाचे अलीकडे पायी चालत असताना डायमंड चौकामध्ये गर्दी झाली होती. आरडाओरडा सर्व गोंधळ सुरु होता. ते पाहून पोलीस धावतच तेथे पोहचले. काही मुले आपसात मारामारी करत असताना दिसले. त्यातील एका मुलाच्या हातात तलवारी सारखे हत्यार दिसून आले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी ५ जणांना पकडले. शुभम पोळ याने सांगितले की, मंडळाचे डेकोरेशनचे काम करण्यासाठी डायमंड चौक येथे रस्त्यावर थांबलेलो होतो. राज राहुल जाधव याने पायी चालत जाताना शुभम यास धक्का दिला. त्यामुळे शुभमने देखील त्यास धक्का दिला. त्यावर राज जाधव याने फोन करुन ४ ते ५ मुलांना बोलावून घेतले. ती मुले शुभम पोळला मारहाण करत असताना त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र सोहेल खान, साहिल खान आले होते. राज जाधव याने बोलविलेल्या ऋषीकेश जाधव याने हातातील फायटरने सोहेल खान यास गळ्यावर व पोटावर मारले. लखन कांबळे याने हाताने मारले. त्याला वाचविण्यासठी समीरने तलवार काढली होती, असे सांगितले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन्ही गटातील ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार तपास करीत आहेत.

You may have missed