Pune Crime News | पुणे: ‘मला भाऊच म्हणायचे, माझ्याशी दुश्मनी घ्यायची आहे का?’; तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडून मारहाण; जबरी चोरी केल्याच्या आरोपावरून तिघांवर गुन्हा

Pune Crime News | Pune: "You used to call me 'brother',do you want to make an enemy of me?" — Youth assaulted after a dog was set upon him; case registered against three individuals for robbery.

पुणे : Pune Crime News | मला भाऊच म्हणायचे, माझ्या पेक्षा मोठे होयचे नाही, तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायची आहे का?, मला ओळख देत नाहीस, असे म्हणून तरुणाच्या अंगावर कुत्रे सोडून त्याला मारहाण करुन खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या तिघांवर बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ओंकार शाहुराज जाधव (वय २७, रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उत्तम कांबळे (वय २७), निलेश कुडले (वय २५), मनिष शेळके (वय २५, सर्व रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील बकुळ हॉल व पापळ वस्ती गणपती मंदिराजवळ ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार जाधव हे २९ सप्टेंबर रोजी दुपारी मोगरवाडी येथे कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता परत आले होते. दुचाकीवरुन जात असताना तेव्हा उत्तम कांबळे याने त्यांना ‘‘काय रे ओंकार’’ असा आवाज दिला. त्यावेळी ओंकार यांनी ‘‘बोल की उत्तम’’ असे म्हणाला असता त्याने ‘‘तू मला आता उत्तम म्हणणार का?’’ असे म्हणाला. तेव्हा ओंकार यांनी त्यास ‘‘बोल की भाऊ’’ असे म्हणाले. त्यावर त्याने ‘‘भाऊच म्हणायचे. माझ्यापेक्षा मोठे व्हायचे नाही. तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायची आहे का?. मला ओळख देत नाहीस’’ तेव्हा ओंकार यांनी त्यास ‘‘मला कमी ऐकायला येते, मी कशाला तुझ्याशी दुश्मनी घेऊ़’’ असे म्हणाले. तेव्हा त्याने ‘‘थांब तुला दाखवतो’’ असे म्हणून ओंकार यांच्या कानाखाली मारली. त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या कुत्र्याला ‘‘धर ह्याला’’ असे म्हणाल्याने त्या कुत्र्याने ओंकार यांच्या दोन्ही पायांना चावे घेण्यास सुरुवात केली.

त्यावेळी उत्तम याने देखील हाताने मारहाण करीत कोणाला तरी फोन करुन लवकर या, एकाला माराचयं असे म्हणत होता. काही वेळातच तेथे निलेश कुडले, मनिष शेळके व एक अनोळखी स्विफ्ट गाडीतून आले. निलेश कुडले व उत्तम कांबळे यांनी ओंकार यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. उत्तम कांबळे याने कपाळावर डाव्या बाजूस, डाव्या हाताच्या दंडाला व मांडीला तोंडाने जोरजोरात चावे घेतले. ओंकार यांच्या खिशात वडिलांनी घराचा हफ्ता बँकेत भरण्यासाठी दिलेले ३४ हजार ५०० रुपये काढून घेतले. खिशातील आय फोन ११ मोबाईल फोडून नुकसान केले. त्यांना गाडीतून पापळ वस्ती गणपती मंदिराजवळ आणले. तेथे बांबुने पुन्हा मारहाण केली. त्यांचा आरडा ओरडा ऐकून अमित चोरघे हा तेथे आला. त्याने ओंकार यांना सोडवण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा उत्तम कांबळे याने त्यालाही शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तुझ्या घरावर पण कोयते फिरवू, असे म्हणून कांबळे व निलेश कुडले याने त्याला तुलाही संपवून टाकेल, अशी धमकी दिली. त्यानंतर ओंकार यांना घेऊन सिटी प्राईड चौकातील मेडिकलजवळ नेले. तेथून पाण्याची बाटली घेऊन पाणी दिले. त्यानंतर बकुल हॉलजवळ सोडले. त्यांनी घरी अपघात झाल्याचे सुरुवातीला सांगितले. कुत्रा चावला असल्याने त्यांनी ओसवाल दवाखान्यात इंजेक्शन घेतले. सिटी स्कॅन केले असता नाकाचे हाड फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गरड तपास करीत आहेत.

You may have missed