Pune Crime News | पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवुन फसवणुक केल्याच्या आरोपावरुन एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: A case has been registered against three members of the same family for allegedly defrauding people by promising high returns on stock market investments.

पुणे : Pune Crime News |  शेअर मार्केट व फॉरएक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दर महा १० टक्के चांगला नफा मिळून देतो, असे आमिष दाखवुन २१ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नवी सांगवीमधील ४१ वर्षाच्या महिलेने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन बाजीराव विलास पाटील Bajirao Vilas Patil (वय ४८), सर्वेष बाजीराव पाटील Sarvesh Bajirao Patil (वय १८, रा. शुभलाभ राजपाल बिल्डिंग, साईराज रेसिडेन्सी, पिंपळे गुरव) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०२४ पासून आतापर्यंत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बाजीराव पाटील यांनी शेअर मार्केट व फॉरएक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळतो. मी तुम्हाला दर महा १० टक्के प्रमाणे नफा देतो, असे आमिष दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांच्याकडे २२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला त्यांनी वेळोवेळी थोड्या प्रमाणात नफा परत देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना नफा देणे बंद केले. फिर्यादी यांनी वेळोवेळी परतावा मागितला. तरी त्यांनी वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली. परतावा  देत नसल्याने त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. तेव्हा त्यांनी पैसे परत केले नाही. शेवटी त्यांनी गुंतवणुकीवर नफा न देता व ट्रेडिंग करीता गुंतविलेले २१ लाख ३७ हजार रुपये परत न करता फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नारायण पाटील तपास करीत आहेत.

You may have missed