Pune Crime News | मुलाच्या प्रेमसंबधातून महिलांनी घरात शिरून मिरची पूड फेकून केली मारहाण; रामवाडी येथील घटनेत चार महिलांसह 7 जणांवर  गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पतीचे  बाहेर प्रेमसंबंध असल्याचे घरात समजल्याने दोघा पती पत्नीमध्ये वादावादी झाली. हे समजल्यावर त्या महिलेने इतर महिलांस घेऊन घरात शिरून सुनेसह घरातील महिलांवर मिरची पूड टाकून त्यांना मारहाण केली. विमानतळ पोलिसांनी चार महिलांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सासरे गंगाधर मारुती वडमारे (वय ६४, रा. रामवाडी) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सीमा शिरोळे, प्राची मोहिते, शबाना खान, रोशनी खान व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा विवाहीत मुलगा विलास वडमारे (वय ३५) याचे एका महिलेबरोबर प्रेमसंबध असल्याची माहिती त्यांच्या सुनेला मिळाली.  त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यावरून एका महिलेने त्यांची सून उमा हिला फोन करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार महिला साथीदारांसह त्यांच्या घरात शिरल्या. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, दगड होते. त्यांनी मिरची पूड त्यांच्या डोळ्यात फेकली. घरातील सर्वांवर हल्ला करून कोठे ती  उमा असे बोलून महिलांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्या मारहाणीत फिर्यादी यांची पत्नी शालन हिचे डोके फुटले. सून उमा, मुलगी वैशाली, यांना मुक्का मार लागला. या मारहाणीचा आवाज एकून परिसरातील महिलांनी या महिलांना पकडून पोलीस ठाण्यात नेले. या वेळी झालेल्या गोंधळात इतर जणी तेथून  निघून गेल्या. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करीत आहेत.

You may have missed