Pune Crime News | जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 6 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्लॅटिनम एज कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे: Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १७ जणांची ५ कोटी ९३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्लॅटिनम एज कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय दीपक भिसे (Akshay Deepak Bhise), स्वेता अक्षय भिसे (Shweta Akshay Bhise), अनिकेत खोज, किरण गजमल (सर्व रा. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नवे आहे. ही घटना १९ जानेवारी २०२२ ते २१ जुलै २०२५ दरम्यान झाला आहे. याबाबत प्रशांत सुरेश आरगे (वय ५२, रा. गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे प्लॅटिनम एज कंपनीचे संचालक आहेत. फिर्यादी व इतरांच्या घरी येऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे व त्यातून चांगला परतावा देण्याचे व एक वर्षानंतर परताव्यासह मुद्दल परत देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी व इतर १६ जणांनी ८ कोटी ९३ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीपोटी त्यांनी ३ कोटी ५१ हजार ३७८ रुपये परतावा म्हणून परत दिले. त्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर लोकांनी पैसे परत मागितल्यावर त्यांनी परतावा देणे बंद केले.

ठरल्याप्रमाणे मूळ मुद्दल व परतावा परत न करता ५ कोटी ९३ लाख ८ हजार ६२२ रुपयांची फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील तपास करीत आहेत.

You may have missed