Pune Congress – Mohan Joshi | पेट्रोल, डिझेल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम! काँग्रेसचा गांधीगिरी आंदोलन सप्ताह – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : Pune Congress – Mohan Joshi | पेट्रोल डिझेल कंपन्या आणि सरकारकडून होणारी जनतेची लूट, दरवाढ याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात दि. ३ ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान गांधीगिरी आंदोलन सप्ताह पाळण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे आज बुधवारी दिली.
https://www.instagram.com/p/DAnQ2LKJ3IC
गांधीगिरी आंदोलनाचा प्रारंभ गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लक्ष्मी रोडवरील कुलकर्णी पेट्रोल पंप येथून होईल. त्यानंतर दरदिवशी विधानसभेच्या एकेक मतदारसंघातील मध्यवर्ती पेट्रोल पंपावर आंदोलन केले जाईल. या आंदोलनात पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोल , डिझेलचे दरपत्रक असलेले एक कार्ड आणि गुलाबाचे फूल भेट देतील. पेट्रोल डिझेल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम., तेल कंपन्य – सरकार झाले मालामाल, जनता झाली बेहाल., अशा घोषणा असलेले फलक हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्ते पेट्रोल पंपावर उभे रहातील. असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/DAnO9mlJmUc
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक महिन्यापासून ३२.५ टक्क्यांनी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तरीही भारतातील जनतेला त्याचा लाभ मिळालेला नाही. यात पेट्रोल डिझेल कंपन्या आणि मोदी सरकार यांनी नफेखोरी केली. लिटरमागे सरसकट २०, २५ रूपये किंमत कमी होणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. यातून मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेची ३५ लाख कोटी रूपयांची लूट झाली आहे, असे विविध पहाणी अहवालातून दिसून आले आहे. या दरवाढीच्या आणि जनतेच्या लुटीच्या निषेधार्थ हे गांधीगिरी आंदोलन होणार असल्याची माहिती मोहन जोशी यांनी दिली.
https://www.instagram.com/p/DAnKESzJCQG
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’