Commercial Gas Iran War | पश्चिम आशियातील संघर्षाची झळ पुण्याला; व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवला

LPG Cylinder Price Hike | Commercial LPG cylinder prices hiked again; Prices hiked in major cities including Delhi, Mumbai

पुणे : Commercial Gas Iran War | पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. पुणे शहरात व्यावसायिक वापरासाठी होणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा आणण्यात आली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा काही काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील भारत पेट्रोलियमच्या प्रकल्पातून तसेच चाकण येथील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या प्रकल्पातून गॅस वितरकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नव्या मागण्या स्वीकारू नयेत आणि गॅस भरण्यासाठी वाहने पाठवू नयेत, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल, भोजनालये तसेच विविध उद्योगांमध्ये केला जातो. धातू वितळवणे, पावडर कोटिंगसारख्या औद्योगिक प्रक्रियांमध्येही या गॅसचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्यामुळे पुरवठा थांबल्यास हॉटेल व्यवसायासह काही उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर आणि त्याच्या दरांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती कशी बदलते याकडे उद्योग आणि व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

You may have missed