Daund Pune Crime News | दौंडमध्ये धक्कादायक घटना; पोलिस निरीक्षकाच्या बंगल्यात घरफोडी, 15 लाखांचा ऐवज लंपास

Crime

दौंड : Daund Pune Crime News | शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे पोलिस निरीक्षक अमितकुमार जैन यांच्या सरकारी बंगल्यात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल 15 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे.

या प्रकरणी लवली अमित जैन (वय 40) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अमितकुमार जैन हे रेल्वे सुरक्षा बलात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांचा सरकारी बंगला रेल्वे स्थानकासमोरील डॉग स्क्वॉड शेजारी, रेल्वे जंक्शन आणि लोहमार्ग न्यायालयाजवळील गजबजलेल्या परिसरात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लवली जैन या बीएड परीक्षेसाठी 18 मे रोजी मध्य प्रदेश येथे गेल्या होत्या. त्यानंतर 10 जून रोजी त्या दौंड येथे परतल्यानंतर बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा उचकटलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, चोरट्यांनी घरफोडी करून मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे उघड झाले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जप्त मुद्देमाल तात्पुरता व्यापाऱ्याच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला.

You may have missed