DG Medal News | पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्यासह 14 पोलीस अधिकारी, अंमलदारांना पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह जाहीर

DG Medal News | 14 police officers, including Police Inspector Wahid Pathan, awarded with Director General of Police's Medal of Honor

पुणे : DG Medal News | महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनाच्या पूर्व संध्येला पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना त्यांच्या सेवा कालावधीतील प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्यासह १४ पोलीस

अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या १५ वर्षाच्या प्रशंसनीय सेवेचा गौरव करण्यात आला आहे.

पोलीस अधिकारी, (पद) नेमणुकीचे ठिकाण

वाहिद अकबर पठाण (पोलीस निरीक्षक) गुन्हे शाखा
विजया शिवाजी खुटवड (सहायक पोलीस उपनिरीक्षक) नांदेड सिटी पोलीस ठाणे
रुस्मत इसाक मुजावर (सहायक पोलीस उपनिरीक्षक) बाणेर पोलीस ठाणे
प्रविण ज्ञानदेव शिंदे (सहायक पोलीस उपनिरीक्षक) हडपसर पोलीस ठाणे
आश्रुबा चांगदेव मोराळे (पोलीस हवालदार) स्वारगेट पोलीस ठाणे
सलीन इन्नुस तांबोळी (पोलीस हवालदार) काळेपडळ पोलीस ठाणे
रामदास निवृत्त गोणते (पोलीस हवालदार) वारजे पोलीस ठाणे
निलेश सोपान पर्वते (पोलीस हवालदार) वाहतूक शाखा
दयाराम दादाराव शेगर (पोलीस हवालदार) वानवडी पोलीस ठाणे
शंकर बाबुराव कुंभार (पोलीस हवालदार) गुन्हे शाखा
सुजित महादेव पवार (पोलीस हवालदार चालक) मोटार परिवहन विभाग
अमोल परशुराम पिलाणे (पोलीस हवालदार) वानवडी पोलीस ठाणे
सौदुबा आप्पाराव भोजराव (पोलीस हवालदार) गुन्हे शाखा
प्रगती रामहरी ठोंबरे (पोलीस अंमलदार) वानवडी पोलीस ठाणे

वानवडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून प्रगती ठोंबरे यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला आहे.

You may have missed