Gold Rates Today | सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले; चांदी 1.94 लाखांवर घसरली

Gold

पुणे/मुंबई : Gold Rates Today | ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर आता महिनाअखेरीस सोन्याच्या भावाने पुन्हा उसळी घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून, दुसरीकडे चांदीच्या किमतीत मात्र घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष सराफा बाजारातील दरांकडे लागले आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत जागतिक तसेच भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावरही ही घसरण कायम होती. महिनाभरात सोन्याचे दर जवळपास सात हजार रुपयांनी कमी झाले होते. मात्र, आता सलग दोन दिवस दरवाढ झाली असली तरी महिन्याच्या तुलनेत सोने अद्याप सुमारे सहा हजार रुपयांनी स्वस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात सोन्याचा भाव किती?

Goodreturns च्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, जळगाव आणि राज्यातील इतर शहरांमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार २९० रुपये नोंदवण्यात आला आहे. तर प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४ हजार ३२९ रुपये आहे. या दरामध्ये ३ टक्के जीएसटीचा समावेश नाही.

२७ ऑक्टोबर २०२६ रोजी सोन्याचे दर :

– २४ कॅरेट सोने : प्रति १० ग्रॅम ₹१,४३,२९० (प्रति ग्रॅम ₹१४,३२९)
– २२ कॅरेट सोने : प्रति १० ग्रॅम ₹१,३१,३५० (प्रति ग्रॅम ₹१३,१३५)
– १८ कॅरेट सोने : प्रति १० ग्रॅम ₹१,०७,५७० (प्रति ग्रॅम ₹१०,७५७)

१० ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील, तर किती खर्च येणार?

सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी प्रामुख्याने २२ आणि १८ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. मात्र, दागिने खरेदी करताना सोन्याच्या मूळ किमतीव्यतिरिक्त मेकिंग चार्जेस आणि जीएसटीही भरावा लागतो.

उपलब्ध अंदाजानुसार, अतिरिक्त शुल्कांसह २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दागिन्यांसाठी सुमारे १ लाख ५१ हजार ५२५ रुपये मोजावे लागू शकतात. तर १८ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दागिन्यांची अंदाजे किंमत १ लाख २४ हजार ९३ रुपये आहे. प्रत्यक्ष किंमत दागिन्यांची रचना आणि सराफानुसार बदलू शकते.

MCX वर सोने तेजीत, चांदीच्या दरात मोठी घसरण!

दरम्यान, सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वरही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोन्याचा भाव ७७ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ११० रुपयांवर पोहोचला.

दुसरीकडे, चांदीच्या दरात एक हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली असून, चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ९४ हजार ८०० रुपयांवर आल्याचे सांगण्यात आले.

ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर पुन्हा वाढू लागल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता पुढील काही दिवसांत सोने आणखी महागणार की पुन्हा स्वस्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may have missed