Pune Crime News | पुणे : कायद्याचा रक्षकच निघाला गांजा तस्कर ! पोलिस कर्मचाऱ्याला अटक; 12 किलो गांजा जप्त

Pune Crime News | Pune: The very protector of law turned out to be a marijuana smuggler! Police officer arrested; 12 kg of marijuana seized

पुणे : Pune Crime News | कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेला पोलिस कर्मचारीच अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपात अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहर पोलिस दलातील एका अंमलदाराला तेलंगणा राज्यात रेल्वेतून १२ किलो गांजाची कथित तस्करी करताना पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नितीन ज्ञानू शिंदे Nitin Dnyanu Shinde (वय ३३, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तेलंगणातील नेकुंडा पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय रजेवर असताना गांजा तस्करीचा आरोप!

नितीन शिंदे हा पुणे शहर पोलिस दलात कार्यरत असून, त्याची नेमणूक वाहतूक शाखेच्या विश्रामबाग वाहतूक विभागात होती. विशेष म्हणजे, तो ८ ऑक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर होता. याच कालावधीत रेल्वेतून १२ किलो गांजा घेऊन जात असल्याच्या आरोपावरून तेलंगणा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईची माहिती तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांना दिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

गांजा कुठे नेला जात होता? आणखी कोणाचा सहभाग?

शिंदे हा एवढ्या मोठ्या प्रमाणातील गांजा नेमका कुठे घेऊन जात होता, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

You may have missed