Hadapsar Boom Case | उषा किरण हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा मोठा खुलासा, उपचाराचे मोठे बिल दिल्याने खंडणी उकळण्यासाठी केला खोडसाळपणा

Hadapsar Boom Case | There was no explosives in the bomb at Usha Kiran Hospital! Police Commissioner Amitesh Kumar's big revelation, mischief was done to extract ransom after paying a huge bill for treatment

पुणे : Hadapsar Boom Case |  हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बमध्ये कोणतीही स्फोटके नव्हती. आरोपीला हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल दिल्याने त्याने यु ट्युबवर पाहून हा बॉम्बसदृश्य वस्तू तयार केली होती. हॉस्पिटलला धमकावुन त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा त्याचा प्रयत्न असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यात कोणताही दहशतवादी अँगल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

https://www.instagram.com/p/DYXA0nfpRZe

हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदश्य वस्तू ठेवणार्‍याला एटीएसने नागपूर रेल्वे स्टेशनवर पकडले. शिवाजी राठोड (वय ३०, रा. मांजरी, मुळ रा. सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे. मांजरी येथे त्याचे चप्पल बुट विक्रीचे दुकान आहे.

याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून गुरुवारी दिवसभर आरोपीच्या जवळपासचे नातेवाईक, मित्र मंडळी अशा १५ ते १७ जणांची काळेपडळ, हडपसर, मांजरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी सुरु होती. त्यातून आरोपी निष्पन्न झाला. त्यानंतर त्याचे दुकान व घर येथे कारवाई करण्यात आली. त्यात या बॉम्बसदृश्य वस्तूसाठी ऑनलाईन मागिवलेल्या डिजिटल घड्याळाचे किट सापडले. त्यावरुन आरोपी निश्चित झाला. तो सायंकाळच्या रेल्वेमध्ये बसून नागपूरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा अकोला पोलिसांना कळविण्यात आले. मुर्तिजापूर येथे त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, रेल्वे पुढे निघून गेली होती. शेवटी नागपूर रेल्वे स्टेशनला एटीएसने त्याला पकडले. त्याला आज रात्रीपर्यंत पुण्यात आणल्यावर अधिक चौकशी केल्यावर त्याचा उद्देश स्पष्ट होईल.

त्याने वापरलेल्या या बॉम्बसदृश्य वस्तूमध्ये कोणतेही स्फोटके नव्हते. ते निकामी केल्यानंतर त्याचे तुकडे व तेथील माती परिक्षणासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आली आहे.

आरोपी हा १० तारखेला त्या हॉस्पिटलला गेला होता. तेव्हा त्याच्या उपचाराचा मोठा खर्च त्याला सांगण्यात आला होता. आरोपी राठोड याची घरची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच आह. त्याचा गुन्हेगारीचा कोणताही पूर्व इतिहास नाही. यु ट्युबवर पाहून त्याने डिजिटल वॉच ऑनलाईन मागविले. त्यानंतर पाईप व इतर साहित्य आजू बाजूच्या दुकानातून खरेदी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

हॉस्पिटलला अगोदर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन करुन धमकावण्याचे त्यासाठी या डमी बॉम्बचा वापर त्याने केला असावा. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवून उडवून देऊ अशी धमकी देऊन खंडणी उकळण्याचा त्याचा उद्देश असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अधिक चौकशीत त्याचा नेमका उद्देश स्पष्ट होऊ शकेल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

You may have missed