Mumbai-Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग जवळपास निश्चित; पुणे अवघ्या 50 मिनिटांत, सोलापूर-पंढरपूरला मोठा फायदा

Mumbai-Hyderabad Bullet Train | Mumbai-Hyderabad Bullet Train route almost finalized; Pune in just 50 minutes, Solapur-Pandharpur will benefit greatly

मुंबई : Mumbai-Hyderabad Bullet Train |  मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रस्तावित हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्राथमिक आराखडा जवळपास निश्चित झाला असून, ‘रेल्वे ॲटलास’मध्ये या मार्गाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या मार्गामुळे पुणे, पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे मार्ग पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी आणि विकाराबादमार्गे जाणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून, याच हायस्पीड कॉरिडॉरचा विस्तार पुणे आणि पुढे हैदराबादपर्यंत करण्याची योजना आहे.

या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ ते ५० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई ते सोलापूर प्रवास सुमारे दीड तासांत, तर पुणे ते सोलापूर प्रवास ४५ ते ५५ मिनिटांत होऊ शकतो. पुणे ते हैदराबाद अंतरही दोन तासांपेक्षा कमी वेळात पार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या हायस्पीड रेल्वे मार्गाचा पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला मोठा फायदा होऊ शकतो. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूरचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि सेवा क्षेत्रालाही या प्रकल्पामुळे नवी गती मिळू शकते.

सोलापूरजवळ स्वतंत्र बुलेट ट्रेन स्टेशन उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात नव्या पायाभूत सुविधा, व्यावसायिक संधी आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे सोलापूर आणि पंढरपूर हे दोन्ही भाग राज्याच्या विकास नकाशावर अधिक ठळकपणे समोर येण्याची चिन्हे आहेत.

You may have missed