Indian Women Cricket | भारतीय महिला क्रिकेट: हरमनप्रीत कौरचा कर्णधारपदाचा राजीनामा; स्मृती मानधनाकडे तिन्ही फॉरमॅटची धुरा
Indian Women Cricket | भारतीय महिला क्रिकेटमध्ये नेतृत्वाचे नवे पर्व सुरू झाले आहे. 37 वर्षीय हरमनप्रीत कौरने कसोटी, वन-डे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांतील भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिलेवहिले महिला वन-डे विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. कर्णधारपद सोडले असले तरी हरमनप्रीत भारतीय संघाकडून खेळाडू म्हणून क्रिकेट खेळत राहणार आहे.
हरमनप्रीतच्या निर्णयानंतर बीसीसीआयने स्टार सलामीवीर आणि माजी उपकर्णधार स्मृती मानधनाची भारतीय महिला संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आता स्मृती कसोटी, वन-डे आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
