Kolhapur Crime | कोल्हापुरात नात्याला काळिमा: 15 वर्षीय मुलीचा जन्मदात्या बापासह सख्ख्या मामाकडून छळ; नराधमांना बेड्या

Kolhapur Crime | Relationships tarnished in Kolhapur: 15-year-old girl tortured by her biological father and close maternal uncle; Murderers arrested

कोल्हापूर :  Kolhapur Crime | ज्यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी होती, त्यांनीच शिकारी बनून नात्याला काळिमा फासल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या बापासह सख्ख्या मामाने अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून, गेल्या ५ वर्षांपासून घरातच तिचे शोषण केले जात होते. घराबाहेर कोणालाही काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी तिला देण्यात आली होती. मात्र, छळाची परिसीमा गाठल्यानंतर या मुलीने धीर धरून आपल्यासोबत घडलेला हा अमानवीय प्रकार उघड केला. पीडित मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. रक्षकच भक्षक बनल्याच्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.

घरासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच मुलीच्या वाट्याला हे नरकयातनांचे जग आले, यामुळे जिल्ह्याच्या सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच तिला मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशनही केले जाणार आहे.

You may have missed