PBG Pune Jaguars | पीबीजी पुणे जाग्वार्सने बटरफ्लाय यूटीटी सीझन 7 च्या लिलावात दिया चितळेला सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी बोली लावून खरेदी केले

PBG Pune Jaguars | PBG Pune Jaguars Make Diya Chitale the Highest-Valued Indian Player for Second Straight Year at Butterfly UTT Season 7 Auction

मुंबई : PBG Pune Jaguars | पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पीबीजी पुणे जाग्वार्सने यंदाच्या सातव्या हंगामासाठी झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेच्या खेळाडूंच्या  लिलावात  पुन्हा एकदा आपल्या भारतीय खेळाडूवर विश्वास दाखवत भर दिला आहे. या लिलावात दिया चितळे (Diya Chitale) हिने सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळवणारी भारतीय खेळाडू ठरत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तिला यावेळी ३७.४ लाख टोकन्स इतकी मोठी रक्कम देण्यात आली.

पीबीजी पुणे जाग्वार्सने केवळ भारतीय खेळाडूंवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंनाही आपल्या संघात सामावून घेतले आहे. फ्रान्सची प्रितिका पावाडे (Prithika Pavade) आणि इजिप्तचा ओमर असार (Omar Assar) यांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, देशांतर्गत फळी अधिक भक्कम करण्यासाठी स्नेहित एसएफआर (Snehit SFR), मुदित दानी (Mudit Dani) आणि सायनिका माजी (Sayanika Maji) यांचीही निवड करण्यात आली आहे.

या निवड लिलावाबाबत बोलताना स्पर्धेच्या सहप्रवर्तक विटा दानी (Vita Dani) यांनी सांगितले की, “या वर्षीची खेळाडू लिलाव प्रक्रिया स्पर्धेची गुणवत्ता दर्शवते. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच उदयोन्मुख भारतीय खेळाडूंमध्ये संघांनी केलेली गुंतवणूक ही सकारात्मक बाब आहे.”

पीबीजी पुणे जाग्वार्सची रणनीती स्पष्ट होती मजबूत भारतीय खेळाडूंवर आधार ठेवत त्याभोवती आंतरराष्ट्रीय अनुभवाची जोड देणे. याबाबत संघाचे मालक पुनीत बालन (Punit Balan) म्हणाले, “दिया ही आधीच जगातील उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणली जाते. ती आमच्या योजनांचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भोवती आम्ही संतुलित आणि सक्षम संघ उभारण्यावर भर दिला आहे.”

स्थिर आणि अनुभवी खेळाडूंचा गाभा तसेच सर्व विभागांमध्ये सखोलता असलेला पीबीजी पुणे जाग्वार्स संघ यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीसाठी सज्ज आहे.

यंदाच्या सातव्या हंगामात एकूण सात संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघाशी एकदा सामना करेल. साखळी फेरीतील अव्वल चार संघ पुढील बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

You may have missed