Pimpri Crime News | अतिक्रमण कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी : Pimpri Crime News | कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक झाल्याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
नाजीम नईम चौधरी Nazim Naim Chaudhary (रा. चिखली) आणि इजाज वकार चौधरी Ijaz Waqar Chaudhary (रा. जाधववाडी, चिखली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी वारंवार शांतता राखण्याचे आवाहन करत जमावाला पांगण्यास सांगितले. मात्र, जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर काही जण घटनास्थळावरून पळून गेले.
दरम्यान, नाजीम चौधरी आणि इजाज चौधरी हे दोघेही घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू असून, दगडफेकीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.
