Pune Crime News | खडकीतील दारूगोळा कारखान्यात स्फोट; कामाच्या पहिल्याच दिवशी 20 वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Pune Crime News | Explosion at Khadki ammunition factory; 20-year-old contract worker dies on his very first day of work.

पुणे : Pune Crime News | खडकी येथील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या अतिसंवेदनशील विभागात झालेल्या स्फोटात कार्तिक बर्मन (वय २०) या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, कार्तिकचा कामावरील हा पहिलाच दिवस होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कामगार संघटनांनी सखोल चौकशीसह मृताच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या एफ-४ विभागाजवळ शौचालय बांधकामाचे काम सुरू होते. कार्तिक बर्मन हा विटा आणि बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम करत होता. सोमवारी दुपारी काम आटोपल्यानंतर तो एका खोलीच्या पायरीवर बसला असताना त्याच्या हाताला एक संशयास्पद वस्तू लागली. काही क्षणांतच त्या वस्तूचा जोरदार स्फोट झाला. गंभीर जखमी झालेल्या कार्तिकचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनचे संयुक्त सचिव रवींद्र रेड्डी यांनी मृताच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

अतिसंवेदनशील विभागात स्फोटक वस्तू आली कशी?

या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियन (तराजू) यांनी केली आहे. अतिसंवेदनशील विभागात कंत्राटी कामगाराला काम करण्याची परवानगी कोणी दिली, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का आणि स्फोटक स्वरूपाची वस्तू तेथे कशी राहिली, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

You may have missed