Pune ACB Trap | पुणे : झुम्बा डान्समुळे होणाऱ्या त्रासावर कारवाई न करण्यासाठी पहिल्यांदा २ लाख रुपये घेतल्यानंतर ५ लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune ACB Trap | Pune: A police constable caught in the anti-corruption net while taking a bribe of 5 lakh rupees after first taking 2 lakh to avoid action over the trouble caused by Zumba dance

पुणे : Pune ACB Trap | झुम्बा डान्समुळे त्रास होतो, या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर आणखी ५ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले.

महेश अंकुश उगले Mahesh Ankush Ugale (वय ३६, रा. विमलनाथ अपार्टमेंट, सुतार चाळ, विजयनगर, बारामती) असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार यांची पत्नी झुंबा डान्स क्लास व जीम चालवतात. या झुम्बा डान्स क्लासमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रार अर्जाची बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश उगले याच्याकडे चौकशीसाठी देण्यात आला होता. ही जीम चालविणार्‍या महिलेवर कारवाई न करण्यासाठी महेश उगले याने महिलेच्या पतीकडे ७ लाख रुपयांची मागणी केली. कारवाईची भीती घालून त्यापैकी २ लाख रुपये यापूर्वी स्वीकारले. उर्वरित ५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यांनी याबाबत ७ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली. त्यात महेश उगले याने ७ लाख रुपयांची बोलणी करुन २ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित ५ लाख रुपयांची मागणी करुन लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

लाच मागणी झाल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी बारामती येथील माळेगाव रोडवरील पी डी सी सी बँकेजवळ तक्रारदाराकडून ५ लाख रुपये स्वीकारताना मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले.

महेश उगले याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार प्रवीण तावरे, पोलीस अंमलदार आश्विन कुमकर, चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली आहे.

You may have missed