Pune Accident News | पुणे: येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात भरधाव कारच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे: Pune Accident News | येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात रस्ता ओलांडत असलेल्या 25 वर्षीय तरुणाला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
देवीदास सोनवणे, वय 25, रा. माऊलीनगर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दत्ता अशोक सोनवणे, वय 35, यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे पावणेदोनच्या सुमारास देवीदास सोनवणे हे गुंजन चित्रपटगृह चौक परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी एका भरधाव कारने त्यांना धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवीदास यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक थोरवे पुढील तपास करत आहेत.
