Pune Crime News | जेवणाचे पैसे देण्यावरुन झालेल्या वादात डोक्यात दगड घालून मित्राचा केला खुन

Pune Crime News | Friend murdered by being struck on the head with a stone following a dispute over payment for a meal.

पुणे : Pune Crime News | दोघेही चालक म्हणून काम करत होते. एकमेकांच्या ओळखीचे दारु पिल्यानंतर जेवणाचे पैसे देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्या वादात मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन करण्यात आला.

राजकुमार अंबाजी सनगुंडे (वय २५, रा. आंबेडकरनगर, आर के कॉलनी, कात्रज कोंढवा रोड) असे खुन झालेल्याचे नाव आहे. येवलेवाडी पोलिसांनी तुषार राजू वाल्हेकर Tushar Raju Walhekar (वय २९, रा. स्वामी समर्थनगर, गोकुळनगर) याला अटक केली आहे. याबाबत राजकुमार यांची बहिण सुदेवी आमरेश कांबळे (वय २९, रा. आंबेडकरनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील एअरकिंग वाईन्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत रविवारी ४ ऑक्टोंबर रोजी साडेचार वाजता घडली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार सनगुंडे आणि तुषार वाल्हेकर हे एकमेकांच्या ओळखीचे असून ते चालक म्हणून काम करतात. ते नेहमी सोबत असायचे. रविवारी दोघांनी एकत्र मद्य प्राशन केले होते. त्यानंतर त्यांनी तेथील चायनीज गाडीवर जेवण केले. त्याचे पैसे न दिल्याच्या  कारणावरुन त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी तुषार वाल्हेकर याने राजकुमार सनगुंडे याच्या डोक्यात तेथे पडलेला दगड घातला. त्यात गंभीर जखमी होऊन राजकुमार सनगुंडे याचा जागीच मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, सहायक पोलीस निरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक विजय महाडिक यांनी घटनास्थळी तातडीने पोहचले़ पोलिसांनी तुषार वाल्हेकर याला पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक दीपक करांडे तपास करीत आहेत.

You may have missed